Wednesday, April 2, 2008

फुगेवाला काका

परवा अचानक रस्त्यात

फुगेवाला काका दिसला

इतक्या वर्षांनी पहिला

तर एकदम म्हाताराच झालेला

वाकलेला पाठीत चांगलाच

आयुश्याने त्याला, केला असावा बराच जाच

पाहिला त्याला आणि मन गेल भूतकाळात

एकदम पोहोचलो मी माझ्याच बाळकाळात

कर कर आवाज करीत फुगेवाला यायचा

आणि मी चड्डी सावरत खिडकीकडे धूम ठोकायचा

हवा असायचा खरा तर रोजच फुगा

पण माहीत असायच हट्ट जाईल वाया उगा

बाबा फूगा घेऊन द्यायचे महिन्याच्या पहिल्या रविवारी

आणि डोळ्यात प्राण आणून वाट पाहायची त्या वाराची स्वारी

लाल पिवळा, हिरवा, निळा रंगीत फुगे अनेक

छोटा मोठा भोप्ळ्या पोट्या आकार तरी किती एक

त्याचा करकरीने मोठे करवादायचे

आम्ही कच्चे बच्चे हरखायचे

टेक्निक भारी हे फुगे विकायाचे

बाबा म्हणायचे

सगळ सगळ आठवल

आणि पुन्हा एकदा फुगे पाहून मन हरखून गेल

माझी २० लाखाची गाडी

कडेला केली ख डी

फुगेवाले काका , हाक दिली

म्हातारा मोठा चट्पटीत

वळला झट्कन एका फिरकीत

म्हटल ओळखल का मला काका

अनेक वर्ष झाली भेटून बर का !

त्याला कुठली ओळख लागायला

आता ना अरधी चड्डी , ना शेम्बड नाक पुसायाला

त्याने आपला दिला ठोकून सलाम

वाटल झालो खास, नव्हे आम!

म्हटल काका, देऊन टाका सगळे फुगे मला

नको आज वणवण फिरायला तुम्हाला

काका हसला जरासा

म्हणाला उपकार केलासा

राखा धा पाच आन् घ्या बाकीच

कच्ची बच्ची चार , हुभी आसत्याला खिडकित दु पा र च

न्हाई गेलो तिकड आज , तर हिरमुसात्या ल फुकाच !

1 comment:

Tushar said...

Dear Madhu,
Kharach... khup chaan lihile ahay.... vaachtana mala mazhe lahan-pun aathavle !!! could visualise the images of an old baloonwala and a small kid !!!
Khup chaan,
Asich lihit rahaa....
Tushar Naik