Wednesday, April 2, 2008

फुगेवाला काका

परवा अचानक रस्त्यात

फुगेवाला काका दिसला

इतक्या वर्षांनी पहिला

तर एकदम म्हाताराच झालेला

वाकलेला पाठीत चांगलाच

आयुश्याने त्याला, केला असावा बराच जाच

पाहिला त्याला आणि मन गेल भूतकाळात

एकदम पोहोचलो मी माझ्याच बाळकाळात

कर कर आवाज करीत फुगेवाला यायचा

आणि मी चड्डी सावरत खिडकीकडे धूम ठोकायचा

हवा असायचा खरा तर रोजच फुगा

पण माहीत असायच हट्ट जाईल वाया उगा

बाबा फूगा घेऊन द्यायचे महिन्याच्या पहिल्या रविवारी

आणि डोळ्यात प्राण आणून वाट पाहायची त्या वाराची स्वारी

लाल पिवळा, हिरवा, निळा रंगीत फुगे अनेक

छोटा मोठा भोप्ळ्या पोट्या आकार तरी किती एक

त्याचा करकरीने मोठे करवादायचे

आम्ही कच्चे बच्चे हरखायचे

टेक्निक भारी हे फुगे विकायाचे

बाबा म्हणायचे

सगळ सगळ आठवल

आणि पुन्हा एकदा फुगे पाहून मन हरखून गेल

माझी २० लाखाची गाडी

कडेला केली ख डी

फुगेवाले काका , हाक दिली

म्हातारा मोठा चट्पटीत

वळला झट्कन एका फिरकीत

म्हटल ओळखल का मला काका

अनेक वर्ष झाली भेटून बर का !

त्याला कुठली ओळख लागायला

आता ना अरधी चड्डी , ना शेम्बड नाक पुसायाला

त्याने आपला दिला ठोकून सलाम

वाटल झालो खास, नव्हे आम!

म्हटल काका, देऊन टाका सगळे फुगे मला

नको आज वणवण फिरायला तुम्हाला

काका हसला जरासा

म्हणाला उपकार केलासा

राखा धा पाच आन् घ्या बाकीच

कच्ची बच्ची चार , हुभी आसत्याला खिडकित दु पा र च

न्हाई गेलो तिकड आज , तर हिरमुसात्या ल फुकाच !

Tuesday, April 1, 2008

आभास

ऐकल होत ज्याच्या त्याच्या तोंडून

तो 'असा' तो 'तसा '

ध्यास होता पहाण्याचा

खरा तू कसा ?



मला आठवते तुझी माझी पहिली भेट

एकमेकांचा घेतलेला अंदाज

आणी क्षणभर जाणवलेला तुझ्यातला 'तू '

आणि माझ्यातली 'मी ' ही


तू होतास तरल कवीमनाचा ,

आणि तरीही कुठेतरी क्यालक्युलेटीव ,

क्रिएटीव कोन्फीडन्सने सलसलनारा

पण आतून थोडासा इन्सेक्युँर


तुझ्या अनेक ध्यासात मी एक

मला मात्र फक्त तुझाच ध्यास

अ ह , मला त्याबद्दल कधीच तकरार नव्हती

आजही नाही

पण एक शंका मात्र छलते कधी कधी

तुझ्या अनेक ध्यासान्मधे तरी मी होते का नक्की

का तो ही होता माझ्याच मनाचा आभास ?

swapna

काल तू माझ्या स्वप्नात आलीस

आभालीची चंद्रकोर अलगद काढून

तुझ्या नाजुक गल्यात सजवलीस

निल्याशार मखमली कुडत्यावर

आभालाची चानदण्या लावलेली

ओढ़णी पांघरून खुदकन हसून

निघून गेलीस !

तुला थाम्बवाव म्हणून हात पुढे केला

सादही घातली ,

पण ज़रा उशीराच झाला बहुतेक

चूट पुट लावून तू गेलीसही !

मग वाटल , म्हणजे स्वप्नातच वाटल ,

आता उद्याच्या रात्रीची वाट,

त्या स्वप्नाची वाट, नुसती वाट पहायची , छे !

वैतागलो जाम, कुशीवर वललो ,

शेजारी तू शांतपणे नीजलेली ,

अगदी स्वप्नात असल्यासारखी ,

कदाचित मलाच पाहत असावीस स्वप्नात

आपण असे एक मकाना स्वप्नात

किती दिवस पहाणार ?

आणि एक्मेकान्कडे पाठ करून

स्वप्न पहान्या करता झोपून जाणार !

Wednesday, March 26, 2008

सुख

मनाच्या एका अनोलखी कोपरयात

अस्वस्थतेची पाल चुकाचुकते

शोधाव तर सापड़त नाही

चुकचुकण काही थांबत नाही


सुखाच भावगीत

आलवून गाव म्हटल तर

दु:खाच मंद पार्श्वसंगीत

सारखा ताल चुकवत रहात



शोधूनही न सापडणार

नाही म्हणाव तर जाणवणार

सुख दुखत , सुख दुखत म्हणतात

ते हेच तर नसाव ?

मला मंजूर नाही

आनंद झाला परका

दु:ख आपले उरले नाही

दगडी हे आयुष्य जगण

मला मंजूर नाही !


तारुंयाची सल सल नाही

वार्धक्याची चाहुल नाही

मध्यंतरातल हे संथ जगण

मला मंजूर नाही!


हास्याचा धबधबा नाही

आसवांचा प्रपात नाही

ठंड निर्जीव असा जगण

मला मंजूर नाही!


धनाढयतेचा माज नाही

दारिद्र्यची आच नाही

मध्यमवर्गी अस आयुष्य

मला मंजूर नाही!


पौर्णिमेचा पूर्ण चंद्र नाही

अमावासयेची काली रात्र नाही

अष्टमीची असून नसल्यासारखी

चंद्रकोर कपलावर मीरवण

मला मंजूर नाही!




मृत्यु : एक अनोख सत्य

एक अनोख सत्य

एक शाश्वत तथ्य


म्हणतो आपण

सत्यं शिवं सुन्दरं

पण या शाश्वत सत्याला मात्र

सतत नजरे आड़ करत राहतो

एकदा याच्याशी दोस्ती करूया

याला म्हणूया , मान्य आहे तुझ अस्तित्व

कधी भेटशील कुणास ठावूक

माझ्या आयुष्याच्या वाटेवर

पण भेटशील एवढ मात्र नक्की ,

जेव्हा केव्हा भेटशील तेव्हा

स्वागत करीन तुझ हसत हसत

खात्री देते तुला पक्की !

Monday, March 24, 2008

माणस

अनेक जातींची , धर्मांची, स्वभावांची

उबदार , पण जाड़ी भारडी कांबल्यासाराखी,

नाजुक पण मऊसूत रेशामासारखी,

अगदी हवी हवीशी जातील तिथे

अगदी नकोनकोशी विचारातसुद्धा,

तत्वनिष्ठ , टोकदार, बाणाच्या पात्यासाराखी,

हो ला हो करणारी , बोथट , शेंबडया लिंबोनीसाराखी

पाण्यासारखी पारदर्शक , गोत्यात येणारी आणि आणणारी

मुखवटयामागचे चेहरे बेमालूम लपवणारीही

मुखातून सतत स्तुतिसुमनेच बरसणारी ,

जन्मच जणू दुसरयाच्या वर्मावर बोट ठेवण्यासाठी झालेली

हसरी हसवणारी ,

रडकी , चीडकी , रडवणारीही ,

अनेक पोत , अनेक धागे

पण अस्सल जतीकुली कलणे महामुश्किल

विधात्याने हे वस्त्र विणतानाच जणू

एक दैवी आणि एक दानवी धागा मागावर चढ़वला असावा!