Wednesday, March 26, 2008

सुख

मनाच्या एका अनोलखी कोपरयात

अस्वस्थतेची पाल चुकाचुकते

शोधाव तर सापड़त नाही

चुकचुकण काही थांबत नाही


सुखाच भावगीत

आलवून गाव म्हटल तर

दु:खाच मंद पार्श्वसंगीत

सारखा ताल चुकवत रहात



शोधूनही न सापडणार

नाही म्हणाव तर जाणवणार

सुख दुखत , सुख दुखत म्हणतात

ते हेच तर नसाव ?

मला मंजूर नाही

आनंद झाला परका

दु:ख आपले उरले नाही

दगडी हे आयुष्य जगण

मला मंजूर नाही !


तारुंयाची सल सल नाही

वार्धक्याची चाहुल नाही

मध्यंतरातल हे संथ जगण

मला मंजूर नाही!


हास्याचा धबधबा नाही

आसवांचा प्रपात नाही

ठंड निर्जीव असा जगण

मला मंजूर नाही!


धनाढयतेचा माज नाही

दारिद्र्यची आच नाही

मध्यमवर्गी अस आयुष्य

मला मंजूर नाही!


पौर्णिमेचा पूर्ण चंद्र नाही

अमावासयेची काली रात्र नाही

अष्टमीची असून नसल्यासारखी

चंद्रकोर कपलावर मीरवण

मला मंजूर नाही!




मृत्यु : एक अनोख सत्य

एक अनोख सत्य

एक शाश्वत तथ्य


म्हणतो आपण

सत्यं शिवं सुन्दरं

पण या शाश्वत सत्याला मात्र

सतत नजरे आड़ करत राहतो

एकदा याच्याशी दोस्ती करूया

याला म्हणूया , मान्य आहे तुझ अस्तित्व

कधी भेटशील कुणास ठावूक

माझ्या आयुष्याच्या वाटेवर

पण भेटशील एवढ मात्र नक्की ,

जेव्हा केव्हा भेटशील तेव्हा

स्वागत करीन तुझ हसत हसत

खात्री देते तुला पक्की !

Monday, March 24, 2008

माणस

अनेक जातींची , धर्मांची, स्वभावांची

उबदार , पण जाड़ी भारडी कांबल्यासाराखी,

नाजुक पण मऊसूत रेशामासारखी,

अगदी हवी हवीशी जातील तिथे

अगदी नकोनकोशी विचारातसुद्धा,

तत्वनिष्ठ , टोकदार, बाणाच्या पात्यासाराखी,

हो ला हो करणारी , बोथट , शेंबडया लिंबोनीसाराखी

पाण्यासारखी पारदर्शक , गोत्यात येणारी आणि आणणारी

मुखवटयामागचे चेहरे बेमालूम लपवणारीही

मुखातून सतत स्तुतिसुमनेच बरसणारी ,

जन्मच जणू दुसरयाच्या वर्मावर बोट ठेवण्यासाठी झालेली

हसरी हसवणारी ,

रडकी , चीडकी , रडवणारीही ,

अनेक पोत , अनेक धागे

पण अस्सल जतीकुली कलणे महामुश्किल

विधात्याने हे वस्त्र विणतानाच जणू

एक दैवी आणि एक दानवी धागा मागावर चढ़वला असावा!